मठ ग्रामपंचायत सदस्यपदी  गाव विकास पॅनल च्या दर्शना नाईक विजयी 

वेंगुर्ला l प्रतिनिधी :वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. ३ मधील रिक्त जागेसाठी ( सर्वसाधारण महिला ) मंगळवार २८ एप्रिल रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ परबवाडा या केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न झाली होती.आज बुधवारी तहसील कार्यालय येथे झालेल्या मतमोजणीत गाव विकास पॅनल च्या दर्शना दिनेश नाईक या २३६ मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपच्या सुप्रिया सुशांत गावडे (१९७ मते ) पराभूत झाल्या. नोटासाठी ११ इतके मतदान झाले.

दरम्यान निकालानंतर पंचायत समिती कार्यालयात उपसभापती सचिन देसाई यांनी विजयी उमेदवार नाईक यांचे अभिनंदन केले. यावेळी स्वप्नील (काका) गडेकर, प्रशांत बोवलेकर, हितेश धुरी, सत्यवान साटेलकर, समीर नाईक, सखाराम परब, समिधा नाईक, सौ. नाईक तसेच मठ ग्रामस्थ उपस्थित होते.