बांदा दाणोली मार्गांवर विलवडे ग्रामपंचायत नजीक भीषण अपघात.

बांदा दाणोली मार्गांवर विलवडे ग्रामपंचायत नजीक भीषण अपघात. ओटवणे (प्रतिनिधी ) बांदा दाणोली मार्गांवर दुपारी 3.30 च्या सुमारास विलवडे वडानाजिक ओहोळात गाडी कोसळून एम एच 12XX 3725 suzuki swift या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला.पुणे येथून गोवा येथे पर्यटनासाठी हे युवक निघाले होते गाडीत पाच जण होते पैकी दोघां जणांना पायाला व हाताला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार समोरून ऊन डोळ्यावर बसल्याने अपघात झाला असं जरी पर्यटक म्हणतं असले तरी सातत्याने या भागात अपघात होत असून याच महत्वाचं कारण म्हणजे रस्त्याची झालेली दुरावस्था आणि असणारा अरुंद रस्ता.या भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते आणि वारंवार या अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. जरी मोठे अपघात झाले तरी सुदैवाने जीवित हानी मात्र झालेली नाही मात्र जीवित हानीची वाट न पाहता संभंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष घालत रस्ता सुस्थीतीत करावा तसेच सध्या या भागात रस्ता रुंदीकरण आणि काँक्रेटिकरणाचे काम सुरु आहे मात्र काही कारणामुळे हे काम बंद असल्याने यावर योग्य तो तोडगा काढत हा रस्ता सुस्थितीत करून रस्ता रुंद करत वाहतुकीसाठी सुसज्ज करावा अशीही मागणी वाहन चालका मधून जोर धरू लागली आहे.या अपघाताची भीषणता पाहता केवळ दैव बलवत्तर म्हणूनच पाचही पर्यटक सुदैवाने वाचले आहेत.