गुहागर (प्रतिनिधी): श्रीदेव गो . कृ . माध्यमिक विद्या मंदिर , स. सु. पाटील विज्ञान, श्री म . ज . भोसले वाणिज्य व कै विष्णूपंत पवार कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त प्राथमिक व माध्यमिक गटात वक्तृत्व स्पर्धा* घेण्यात आली . या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यानी मोठया संख्येने सहभाग घेतला .याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कांबळे सर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी पर्यवेक्षिका सुजाता कांबळे व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
श्री कतकर सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपले विचार मांडले.
मा . मुख्याध्यापक श्री. एस. एस. कांबळे सर, पर्यवेक्षक श्री. एम एस गंगावणे सर व प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक श्री एम एम ढेरे सर* यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.यावेळी मराठी भाषा विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे , स्पर्धक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .मान्यवरांनी स्पर्धक विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले .विभाग प्रमुख श्री पी बी जाधव सर यांनी स्पर्धकांना मूल्यमापन निकष व नियम सांगितले आणि उपस्थित मान्यवरांच्या परवानगीने स्पर्धेला सुरुवात झाली .
ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटात घेण्यात आली . या स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .
प्राथमिक गट -प्रथम-दुर्वा दशरथ नाटेकर – ५वी अ*
द्वितीय- स्वरा मंगेश पाटील – ७वी ब*
तृतीय-.शौनक नितीन दीक्षित- ५वी अ*
माध्यमिक गट -प्रथम ( विभागून ) -सोनल शशिकांत महाजन,ओम दिपक देवकर
द्वितीय -*प्रांजल प्रशांत गोयथळे
तृतीय ( विभागून ) –
शर्वरी जनार्दन देवकर,समर्था मंदार मोरे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री पी बी जाधव सर, सौ एस एस ठाकूर मॅडम, सौ.उत्कर्षा तांबट-कांबळे मॅडम,सौ. ज्योती माने मॅडम यांनी केले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे शाळा समिती अध्यक्ष श्री दिपकजी कनगुटकर यांच्या वतीने, संस्था व शाळेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले .












