फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये थॅलेसेमिया आणि मधुमेह जागरूकता सत्र संपन्न

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी नेहमीचं विद्यार्थ्यांना चांगल्या तांत्रिक ज्ञानासोबत आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. याच अंतर्गत मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना युनिट, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एफएएमटी), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया आणि मधुमेह जागरूकता सत्राचे आयोजन फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये शुक्रवार दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ रोजी केले होते.
या सत्राचे उद्घाटन फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी केले. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ . अनुप करमरकर व मुकुल माधव फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिषेक साळवी यावेळी उपस्थित होते.

थॅलेसेमिया आणि मधुमेह जागरूकता सत्र झूम प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन घेण्यात आले. यामध्ये मुकुल माधव फौंडेशनच्या श्रीमती यास्मिन शेख, तज्ज्ञ डॉ. नीता मुन्शी व डॉ. नीलम ठुसे सहभागी झाल्या होत्या.
डॉ. नीता मुन्शी (संचालक प्रयोगशाळा, संक्रमण नियंत्रण आणि गुणवत्ता, रुबी हॉल क्लिनिक, पुणे.) यांनी थॅलेसेमिया आजारासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच डॉ. नीलम ठुसे (केईएम रुग्णालयाच्या संशोधन समन्वयक) यांनी मधुमेह आजारासंदर्भात मार्गदर्शन केले.
अॅकॅडमीच्या ०६ प्राध्यापकांसह २२८ विद्यार्थी जनजागृती सत्रात सहभागी झाले होते.
थॅलेसेमिया आणि मधुमेह जागरूकता सत्रानंतर या आजारासंदर्भात रक्त तपासणीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकूण 109 विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्त तपासणी करवून घेतली.
सीबीसी आणि एचपी इलेक्ट्रोलिसिस चाचणीसाठी कोल्हापुर येथील लाईफ सेल इंटरनॅशनल लॅब आणि मधुमेह तपासणीसाठी रत्नागिरी येथील नेक्सलीफ लॅबच्या तज्ज्ञांनी या तपासण्यासंदर्भात काम पहिले.
प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी, एनएसएस युनिट प्रा.उमेश के सामंत, प्रा.सचिन गुरव, प्रा.प्रियांका दाते, प्रा.सौरभ शहाणे, प्रा.प्रिया पोतदार, प्रा.हर्षा केळकर यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.