▪️रोटरी क्लब मुंबई माहिम व बॅ नाथ पै सेवांगणचे आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर
जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने केंद्र शाळा कट्टा येथे वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लब मुंबई माहिमच्या वतीने कट्टा परिसरात ३० जून पर्यंत ११०० झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ
केंद्रशाळा कट्टा येथे काजूची कलमे लावून करण्यात आला.
या वेळी बॅ नाथ पै सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सर्वानीच गांभीर्याने विचार करून पर्यावरण रक्षणासाठी किमान एक वृक्ष लावणे गरजेचे आहे. तसेच त्या वृक्षाची निगा राखणे तेवढेच महत्वाचे आहे. येत्या ११ तारीखला
साने गुरुजी पुण्यतिथी ला १०० विद्यार्थ्याना वृक्ष भेट देण्यात येणार असून त्यांचे महत्वही मुलाना समजावण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
केंद्र मुख्याध्यापक कुराडे सर यानीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. रोटरी क्लब माहिमने व सेवांगणने हा कार्यक्रम कट्टा शाळेत केल्याबद्दल आभार व्यक्त केले . आणखीही काही झाडे शाळा सुरू झाल्यावर आपल्या सहकार्याने लावण्यात येतील असे ते म्हणाले.
केंद्रशाळेत लावण्यात आलेली काजूची कलमे हिरवाई नर्सरीचे मालक विकास म्हाडगुत यानी दिली.
या कार्यक्रमास सेवांगण कट्टाचे अध्यक्ष बापू तळावडेकर, विश्वस्त दीपक भोगटे,
सभासद विद्या चिंदरकर, मुख्याध्यापक कुराडे सर, मंगल पराडकर, साक्षी अमरे, श्रीधर गोंधळी शिवण विभागाच्या विद्यार्थिनी व मुले उपस्थित होती.











