मालवण शहर बौद्धवाडी येथे तरुणाची आत्महत्या
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील बसस्थानक पाठीमागील बौद्धवाडी येथील चंद्रसेन प्रकाश चाफेखोलकर (वय २८) मूळ रा. तोंडवळी मालवण या युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. गेले वर्षभर त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती त्याचा भाऊ अमोल चाफेखोलकर याने मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत घेत शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला.
या मृत्यू प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत.
फोटो : चंद्रसेन चाफेखोलकर












