देवगड जामसंडे नगरपंचायत व पुरवठा विभाग यांच्याविरुद्ध उपोषण
देवगड तहसीलदार समोर दोन नागरिकांनी उपोषण आरंभले असून यातील प्रशांत खवळेकर यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या गैरकारभाराविरोधात उपोषण सुरू केले आहे
तर विजयदुर्ग येथील गणेश कीर यांनी पुरवठा विभागाच्या विरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे
देवगड जामसांडे नगरपंचायतीने खाजगी जागेतील सांडपाण्याची आमचा संबंध नाही असे उत्तर दिल्याने प्रशांत खवणेकर यांनी उपोषण सुरू केले आहे.
प्रशांत खवणेकर हे सडा भागात राहत असून शेजाऱ्याने आपले सर्व सांडपाणी गडग्याला भोक पाडून येण्या जाण्याच्या वाटेवर सोडले आहे याबाबत प्रशांत खवणेकर यांनी वारंवार पाठपुरावा करून व निवेदन देऊन याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही याउलट हे सांडपाणी खाजगी जागेतील असल्याने आपण बंदोबस्त करू शकत नाही असे उत्तर त्यांनी दिले आहे
यावर प्रशांत खवळेकर यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे
आपली आई वृद्ध असून तिला रेशन दुकानावर रेशन घेण्यासाठी येता येत नाही यामुळे तिचा मुलगा म्हणून तिला माझ्या अंगठ्यावर तिचे रेशन मिळावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून पुरवठा विभाग दाद देत नसल्याने पुरवठा विभागाच्या गैरकारभाराविरोधात विजयदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश कीर यांनी उपोषण सुरू केले आहे
उपोषणकर्त्यांची नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी भेट घेतली आहे मात्र ते वगळून अद्याप कोणीही उपोषणकर्त्यांकडे फिरकलेले नाही












