तालुकास्तरीय विज्ञान वत्कृत्व स्पर्धेत राणे इंग्लिश मिडीयमच्या स्वरा साळवीचे यश

 

लांजा (प्रतिनिधी) तालुकास्तरीय विज्ञान वत्कृत्व स्पर्धेत राणे इंग्लिश मिडीयमच्या स्वरा साळवीने सुयश संपादन केले आहे. १८ ऑगस्ट रोजी होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
तालुकास्तरीय विज्ञान वत्कृत्व स्पर्धेत राणे इंग्लिश मिडीयमच्या स्वरा साळवीचे यश…..
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (Millet Year) Mi म्हणून घोषित केले आहे. जगभरातील अनेक देशांनी या प्रस्तावला पाठींबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भरड धान्याच्या योगदानाचे महत्व आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.
पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा आणि लांजा तालुका विज्ञान मंडळ यांच्या वतीने तालुकास्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कै.एकनाथ राणे इंग्लिश मिडीयम हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा महेंद्र साळवी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला दि १८-0८-२०२३ रोजी होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. यासाठी तिला शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीम.तोडणकर व श्रीम. पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनुराधा राणे मँडम, संस्थेचे पदाधिकारी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.