चिपळूणच्या ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर येथे यशस्वी शस्त्रक्रिया
चिपळूण | प्रतिनिधी : भारतात तोंडाचा कर्करोग हा आता सामान्य कर्करोग आहे. कारण मागील १० वर्षात या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तोंडाच्या वर आणि जिभेच्या खाली ओठ, हिरड्या, जीभ, गालांच्या आतील भागासह तोंडाच्या कोणत्याही भागात हा कर्करोग होऊ शकतो.
चिपळूणच्या ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर येथे तोंडाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या ८२ वर्षांच्या वृध्द महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. या तोंडाचा कर्करोगात डाव्या बाजूचा सायनस आणि जबडा (जबड्याचा) देखील समावेश होता. हा कॅन्सर दर आठवड्याला अतिशय वेगाने पसरत होता, तो त्वचेवरही आक्रमण करु लागला होता. वय आणि रुग्णाची परिस्थिती पाहता हे शस्त्रक्रियेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले होते.पण वेळीत उपचार केले नसते तर रुग्णाला वाचविणे शक्य नव्हते. डॉक्टरांकडून शारीरीक तपासणीनंतर ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. एहसान शेख आणि डॉ. अविनाश पवार यांच्याकडे ऍनेस्थेटीक म्हणून विस्तृत शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.शस्त्रक्रियेदरम्यान बदलणाऱ्या ईसीजीचे अचूक व्यवस्थापन करण्यात आले.
प्लास्टिक सर्जरीसह या रुग्णावर यशस्वी कर्करोग शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ एहसान शेख आणि टीमने प्रसंगावधान राखत रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली व रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले.












