युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, भालावली येथे मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी “फिल्म क्लबचे उद्धघाटन” करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन “आझादी का अमृत महोत्सव” निमित्ताने ७६व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून “फिल्म क्लबचे” उद्धघाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना “जय भीम” चित्रपट दाखवण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक प्रकाश कोंडसकर यांनी “फिल्म क्लबचा ” उद्देश आणि त्याचे महत्व याबाबत थोडक्यात सांगितले.
या चित्रपटामध्ये एका आदिवासी स्त्री ने वकिलाच्या मदतीने केलेल्या संघर्षाची कथा दाखवण्यात आलेली आहे. चित्रपट संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांचे शंका समाधान करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र. प्राचार्य नामजोशी यांनी “विद्यार्थ्यामध्ये चित्रपट पाहण्याची दृष्टी निर्माण व्हावी आणि चित्रपटाचे विश्लेषण करता यावे हा फिल्म क्लबचा मुख्य उद्देश आहे” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.कोंडसकर यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. कोंडसकर यांनी प्र.प्राचार्य नामजोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या “फिल्म क्लब” विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लिंगायत यांनी केले व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.











