कणकवली दिनांक: ६
नुकत्याच झालेल्या कणकवली बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ॲड. राजेश परुळेकर हे भरघोस मतांनी विजयी झाले. या त्यांच्या यशाबद्दल पूर्णानंद महिला मंच कणकवली यांच्यातर्फे आज रोजी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत कणकवली न्यायालयाच्या नूतन इमारतीसह अनेक गोष्टी यशस्वीरित्या मार्गी लागोत अशा शुभेच्छा याप्रसंगी मंच सदस्यांनी दिल्या.
या सत्कार प्रसंगी सौ गीता परुळेकर, मंचाच्या अध्यक्षा सौ सुलभा सामंत यांच्यासह सौ रूपा प्रभू, मनिषा देसाई, सपना देसाई, सुरेखा परुळेकर, नेत्रा आजगावकर, राजश्री ठाकूर आदि महिला उपस्थित होत्या.
ॲड परुळेकर यांनी सर्वांचे आभार मानून कणकवली बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून या पदाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.
Home सिंधुदुर्ग कणकवली बार असोसिएशन, कणकवलीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. राजेश परुळेकर यांचा पूर्णानंद महिला...












