‘Beneficiary Satyapan’ व ‘Aadhaar Face ID’ ॲपद्वारे घरबसल्या करता येणार सत्यापन
कणकवली : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी ऑनलाइन हयात दाखला भरून लाभार्थी सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘Beneficiary Satyapan App’ तसेच ‘Aadhaar Face ID’ ॲप डाउनलोड करून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे ऑनलाइन सत्यापन करून घ्यावे. हे सत्यापन पूर्ण केल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया लाभार्थ्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांनी विलंब न करता ऑनलाइन हयात दाखला भरून लाभार्थी सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.












