प्रहार इम्पॅक्ट : बांदा – दाणोली जिल्हा मार्गांवरील जीवघेणे खड्डे अखेर भरण्यास सुरुवात.

ओटवणे (प्रतिनिधी )
बांदा दाणोली मार्गातील विलवडे येथे पडलेले खड्डे भरण्यास अखेर सुरुवात करण्यात आली आहे.बांदा दाणोली मार्गाच्या नूतणीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर अर्धवट स्थितीत राहिल्याने रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.वाहन चालकांच्या जीवाशी खेळ सुरु होता मात्र सार्वजनिक बांधकाम खात आणि ठेकेदार यावर कोणतीही उपाययोजना करत नव्हतं. अखेर या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल दै.प्रहार, डिजिटल प्रहार मधून बातमी प्रसिद्ध झाली आणि झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आणि ठेकेदाराला जाग आली. त्वरित खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सद्यस्थीतीत विलवडे वडापासून ते ओटवणे सरमळे पुला पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वाहन चालकांच्या जीवाशी खेळ सुरु होता सध्या तर काम सुरु होईल याची कोणतीही शाश्वतीही नाही. मात्र तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात तरी करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम खात्याला बातमीमुळे उशिरा का असेना शहाणपण सुचलं असच शहाणपण लवकर सुचो बांधकाम खात्याने झोपेतून थोडं जाग व्हावं आणि अर्धवट सुरु असणाऱ्या कामाला गती द्यावी आणि काम पूर्ण कराव अशी अपेक्षा वाहन चालकामधून करण्यात येत आहे.