उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर व पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांची सामाजिक बांधिलकी
लांजा (प्रतिनिधी) : खड्डेमय बनल्यामुळे वाहतुकीस अयोग्य ठरलेल्या लांजा शहरातील दर्गा रोड वरील खड्डे शुक्रवारी स्वखर्चाने बुजवून लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर आणि पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
लांजा शहरातील दर्गा रोड कडे जाणारा रस्ता हा गेल्या काही दिवसांपासून खड्डेमय बनला होता. त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांची त्रेधा तिरपीट उडत होती. तर शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठी गैरसोय होत होती. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
दरम्यान येथील नागरिक विद्यार्थी यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर तसेच पाणी सभापती गुल्या नेवरेकर यांनी आज शुक्रवारी स्वखर्चाने खडीने रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्यात आले आणि रस्ता वाहतूक योग्य करण्यात आला. त्यांच्या या कार्य कुशलतेचे नागरिकांतून कौतुक होत आहे.













