ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास; रात्रीच्या सुरक्षिततेसह दूध डेअरीवर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. मनोजजी रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्या सौ. मानसी बाळकृष्ण मराठे यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्णत्वास आली आहे.
फोंडाघाट : घोणसरी-पिंपळवाडी व खवळेभाटले परिसरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामांचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यामध्ये पिंपळवाडी येथील पेडणेकर घर ते खाड्ये यांच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईट, तसेच घोणसरी-पिंपळवाडी मुख्य रस्ता आणि घोणसरी मुख्य रस्ता ते खवळेभाटले या मार्गावरील स्ट्रीट लाईटच्या कामांचा समावेश आहे.
या परिसरात सायंकाळच्या वेळेस अनेक ग्रामस्थ दूध घालण्यासाठी डेअरीवर जात असतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांचीही या मार्गावरून ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध झाल्याने सायंकाळनंतरची ये-जा अधिक सुरक्षित व सोयीची होणार असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामांच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मा. मनोजजी रावराणे, पंचायत समिती सदस्या सौ. मानसी मराठे, सरपंच श्री. प्रसाद राणे, उपसरपंच सौ. अंकिता परब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. अशोक राणे, आप्पा पेडणेकर, श्री. दिवाकर कारेकर तसेच पिंपळवाडी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक वर्षांची मागणी प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पंचायत समिती सदस्या सौ. मानसी मराठे यांचे आभार मानले.










