मसुरे | झुंजार पेडणेकर : कृषी विभाग (आत्मा) व ग्रामपंचायत पळसंब मार्फत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी विशेष ऑनलाईन अर्ज नोंदणी शिबीराचे आयोजन पळसंब येथे करण्यात आले होते. पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या निवासस्थानी आयोजित या नोंदणी शिबिराचा 57 महिलांनी लाभ घेत नाव नोंदणी केली.
महिला शेतकरी प्रमाणपत्राद्वारे शासकीय योजना, सबसिडी आणि अनुदानात विशेष सवलत व प्राधान्य मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घेणार आवश्यक असल्याचे सरपंच चंद्रकांत गोलतकर म्हणाले.
यावेळी मालवण तालुका कृषी शेतकरी सल्ला समिती सचिव व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. निलेश गोसावी, कृषी सेवक श्री.अश्चिन कुरकुटे, प्रमोद सावंत,राजन पुजारे तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.











