केंद्र शाळा साळशीला सामाजिक बांधिलकीतून प्रेशर पंपची भेट

साळशी येथील केवल साळसकर यांचा स्तुत्य उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील साळशी येथील दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. केवल भाऊ साळसकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत केंद्रशाळा साळशी नं. १ या शाळेला प्रेशर पंप भेट दिला.

केवल साळसकर यांच्या योगदानामुळे शाळेसाठी मदत होणार आहे.शाळेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी दिलेल्या या उपयुक्त साहित्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन श्री. साळसकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

या प्रसंगी भौतिक सुविधा समितीचे सदस्य विजय सुतार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश गावकर, सदस्य योगेश घाडी, मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.