ओटवणे (प्रतिनिधी ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना सावंतवाडी प्रकल्पा अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह तसेच माझी अंगणवाडी माझी जबाबदारी या उपक्रमाचे आयोजन ओटवणे गवळीवाडी अंगणवाडी येथे करण्यात आले. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, ग्रा. सदस्य तथा भाजप शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत बुराण, बूथ अध्यक्ष विश्वनाथ बोर्ये,ओटवणे गवळीवाडी शाळा नंबर 3 च्या मुख्याध्यापिका सौ. सावंत, तसेच ओटवणे आरोग्य केंद्र कर्मचारी आशा वर्कर, गावातील सर्व अंगणवाडी सेविका, स्तनदा माता, माता पालक आदी ग्रामस्थ हजर होते.
यावेळी उपस्थित बालक, माता तसेच उपस्थित ग्रामस्थाना संतुलित आहार आणि त्याच आहारातील महत्व काय तसेच प्रथिन युक्त पदार्थ रानभाज्या कडधान्य याविषयीही माहिती देण्यात आली. अतिशय स्तुत्य आणि माता नवजात बालक यांच्यासाठी अतिशय सुंदर उपक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच अंगणवाडीच्या वतीने राबविण्यात आला याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.











