माखजन प्रशालेत गड किल्यांचा अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन

माखजन |वार्ताहर :    दरवर्षी प्रत्येक शाळांच्या शैक्षणिक सहली जात असतात.काही ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात तर काही प्रयत्न स्थळांना,एकूणच सर्वांगाने मातृभूमीचा परिचय करून घेणे हाच त्या मागचा उद्देश असतो.विद्यार्थी दशेत सहली गड किल्यावरती गेल्या तर त्याचा अभ्यास कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना फार शी माहिती नसते.हा विचार डोळ्यासमोर ठेऊन संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांना व गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पुण्यातील गड किल्ल्यांचे अभ्यासक श्री ओमकर केळकर उपस्थित होते.यावेळी श्री ओमकर केळकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक अंबादास घाडगे, मा.पं.शि.प्र.मंडळा चे संचालक विवेक केळकर,गुरुकुल उपक्रम प्रमुख सचिन साठे,विठ्ठल भोईर उपस्थित होते.