आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने देवूळवाडी वहाळावर वनराई बंधारा

आचरा-अर्जुन बापर्डेकर
पाणी टंचाईची समस्या उग्र होण्याचे संकेत मिळत असल्याने भविष्यातील पाणी टंचाई निवारण्याच्या दृष्टीने आचरा ग्रामपंचायती तर्फे वनराई बंधारे बांधले जात आहेत. आचरा देवूळवाडी येथील वहाळावर आणि मिराशी वाडी येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात आले.यावेळी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविकांच्या सोबतीने रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे पदाधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते. यावेळी सरपंच जेरान फर्नांडिस यांसह जिल्हा परिषद सदस्य सौ वर्षा सांबारी,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले,रामेश्वर वाचन मंदिराचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर,ग्रंथपाल विनिता कांबळी,महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, कृषी सहाय्यक रामकृष्ण धाकोरे,आरोग्य सेवक सेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते.