कारवार, कुमठा, होन्नावरसह कोकण रेल्वेमार्गावरील स्थानकांवर थांबे; प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी निर्णय
देवगड : प्रतिनिधी
दसरा सण २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयातून यशवंतपूर-मडगाव-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट दरम्यान विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत कोकण रेल्वेने १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
यशवंतपूर-मडगाव विशेष गाडी
गाडी क्रमांक ०६५९१ यशवंतपूर-मडगाव जंक्शन एक्स्प्रेस विशेष रेल्वे १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजता यशवंतपूर येथून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचणार आहे.
या गाडीला कुनिगल, चन्नरायपटना, हासन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबकापुत्तूर, बंटवाळ, सुरतकल, मुल्की, उडुपी, बारकूर, कुंदापूर, मूकांबिका रोड बिंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, होन्नावर, कुमठा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार आणि काणकोण या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
मडगाव-बेंगळुरू विशेष गाडी
गाडी क्रमांक ०६५९२ मडगाव जंक्शन-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट एक्स्प्रेस विशेष रेल्वे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून, त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंट येथे पोहोचणार आहे.
या गाडीला काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बिंदूर, कुंदापूर, बारकूर, उडुपी, मुल्की, सुरतकल, बंटवाळ, काबकापुत्तूर, सुब्रह्मण्य रोड, सकलेशपूर, हासन, चन्नरायपटना आणि कुनिगल या स्थानकांवर थांबे असतील. याशिवाय बेंगळुरू येथील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल येथेही ही गाडी थांबणार आहे.
एकूण १८ डबे
या विशेष रेल्वेला एकूण १८ एलएचबी डबे असणार आहेत. त्यामध्ये वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा एक, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे तीन, शयनयान श्रेणीचे पाच आणि सामान्य श्रेणीचे सात डबे असतील. याशिवाय एक एसएलआरडी आणि एक जनरेटर कार असेल.
या विशेष रेल्वेसेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाडीचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.












