दिगवळे येथे बंधाऱ्याच्या प्लेट चोरीला 

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कणकवली : दिगवळे-किनवनेवाडी येथे एका शेडमध्ये गडनदीतील पात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी ठेवलेल्या १ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या १५३ लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरल्या. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी लघू पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल तुकाराम सामंत (वय ४३, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. कुडाळ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात तक्रार दिली.

 

याबाबत अधिक वृत्त असे की, दिगवळे-किनवडेवाडी येथे पावसाळ्यापूर्वी केटी बंधाऱ्यावरील घातलेल्या लोखंडी प्लेट्स काढून त्या या परिसरातील एका शेडमध्ये ७ जून २०२६ रोजी ठेवण्यात आल्या होत्या. जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अज्ञातांनी प्लेट्स चोरल्या आहेत. गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या विशाल सामंत हे लघू पाटबंधारे विभागाच्या ओरोस येथील कार्यालयात असताना त्यांना नवनाथ पवार यांनी फोनकरून उघड्या शेडमध्ये ठेवलेल्या १५३ लोखंडी प्लेट्स दिसत नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सामंत हे घटनास्थळी गेले असता लोखंडी प्लेट्स शोध घेतला. परंतु त्या सापडून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञाताने प्लेट्स चोरून नेलेल्या आहेत, असे सामंत यांनी फिर्यादी म्हटले आहे.