सेवांगणच्या ऑनलाईन स्पर्धेत  पार्वती कोदे प्रथम!

मसुरे | झुंजार पेडणेकर

मराठी भाषा आणि संस्कृती मंडळ अनुदानीत बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६, च्या निमित्ताने सिंधुदुर्गातील साहित्यिक यावर आधारित ३० प्रश्नांची ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धा घेण्यात आली. सिंधुदुर्गातील काही साहित्यिकांच्या साहित्यावर आधारति

ही स्पर्धा होती. सर्वांना सिंधुदुर्गातील साहित्यिकांच्या साहित्याची ओळख

व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.

या स्पर्धेत राज्यभरातून ३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत मसुरे, ता मालवणची

पार्वती कोदे यांना प्रथम क्रमांक मिळाला.

उर्वरित निकाल खालील प्रमाणे.

 

*द्वितीय क्रमांक -* अनिल देवकुळे, प्रेरणा चिंदरकर

*तृतीय क्रमांक -* धनश्री तारी, वैष्णवी आचरेकर, विशाखा पालव, रोहिणी मसुरकर.

*चतुर्थ क्रमांक -* किशोर वालावलकर, पूनम चिंदगे, सागर कदम, प्रिया कुबल, साक्षी देसाई, अर्चना धुत्रे

*उत्तेजनार्थ क्रमांक-* वृषाली आचरेकर, जयप्रकाश पेडणेकर, वेदांत सावंत, जागृती आंबेरकर, श्रुतिका डिचोलकर , विशाल आंबेरकर , मायलिक फर्नांडिस, वैदही आरोंदकर, सीमा पालकर, नंदकुमार वडेर, संगिता महाजन, आचल ओरोसकर, ओवी ओरोसकर

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या ऑनलाईन बक्षीस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष – ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष – किशोर शिरोडकर, कार्यवाह – लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष – शैलेश खांडाळेकर. व सर्व सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन दीपक भोगटे व विणा चव्हाण यानी केले.