गौरी परब यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी संघटनेकडे रुग्णोपयोगी साहित्य प्रदान 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथील रहिवासी गौरी प्रवीण परब यांती आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकीच्या आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्याजवळ व्हीलचेअर, कमोड चेअर, बेड, ३ वॉकर इत्यादी रुग्णपयोगी वस्तू सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला दिल्या. हे साहित्य गरजू रुग्णांना मोफत वापरासाठी देण्यात येणार आहे.

आपण सामाजिक बांधिलकीचा एक हिस्साच आहे असं समजून कधीही गरज भासल्यास हाक द्या असंही त्यांनी सांगितलं. संजय पेडणेकर व सामाजिक बांधिलकीच्या टिम ने त्यांच्या या सेवाभावी कार्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. गौरी परब यांनी दिलेल्या या रुग्णपोयोगी वस्तूंची सेवा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गरजू लोकांना विनामूल्य दिली जाईल.

दरम्यान, अशा प्रकारच्या वस्तू दानशूरांनी सामाजिक बांधिलकीला दिल्या तर गोरगरीब व गरजू रुग्णापर्यंत त्या वस्तू विनामूल्य तत्त्वावर दिल्या जातील त्याचा फायदा जेणेकरून गोरगरीब रुग्णांना होईल, असे आवाहन संजय पेडणेकर यांनी केले आहे.