विलवडे येथिल प्रसिद्ध दशावतार तबला वादक महादेव दळवी यांचे निधन

ओटवणे (प्रतिनिधी ) विलवडे गावचे रहिवासी आणि तब्बल ४५ हून अधिक वर्षे दशावतारात तबला वादन करणारे महादेव उर्फ बाबी दळवी वय ६५ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विलवडे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे बाबी दळवी यांनी ४५ हून अधिक वर्षे नाईक मोचेमाडकर या एकाच दशावतार नाट्य कंपनीत सेवा बजावली.सध्या बदलत्या दशावताराच्या काळातही त्यांनी तबल्याची आणि दशावतारची साथ सोडली नाही त्यांचे गायनही तेवढेच बहारदार होते. त्यांच्या जाण्याने दशावतार कलेची सेवा करणारा दशावतार कलेचा पूजक हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या जाण्याने दशावतार क्षेत्राबरोबर दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांचा मनमिळावू दिलखुलास स्वभाव यामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे भाऊ भावजय पुतणे असा मोठा परिवार आहे.येथिल विलवडे माऊली देवस्थानचे मानकरी राकेश दळवी, विष्णू दळवी यांचे ते वडील होत.आज ११ वाजता त्यांच्यावर दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.