बिळवस येथे श्री देवी सातेरी जलमंदिरात हरिनाम सप्ताह व कार्तिकी जत्रोत्सवाचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर :                 मसुरे गावची मुळमाया असणाऱ्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरात २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून आठ प्रहरच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे. या सप्ताहात भाविक-भक्तांनी आपल्या भजनी मेळ्यांसह उपस्थित राहून सहभाग घ्यावा आणि देवीच्या दर्शनाचा व सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच २२ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने श्री सातेरी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार आहे. या दिवशी देवीची विधीवत पुजा-अर्चा, रात्री पुरान वाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे आणि त्यानंतर ठीक १२.०० वाजता प्रसिद्ध ‘चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी’ यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.