मंडणगड (प्रतिनिधी) : आद्य क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाचरळ येथील ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे यांचा भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचेवतीने 16 नोव्हेंबर 2026 रोजी सन्मान करण्यात आला. महसूल विभागाचे माध्यमातुन तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी ते करित असलेल्या कार्याची दखल घेत अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमासस देव्हारेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, पालवणीचे ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे तसेच ग्राम महसूल अधिकारी सिद्धी भोईर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, महसूल विभाग हा ग्रामिण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे. नागरिकांना विविध शासकीय दाखले, महसूलविषयक कागदपत्रे, जमिनीच्या नोंदी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या जबाबदाऱ्या पार पाडताना नागरिकांशी समन्वय ठेवून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते.ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे यांनी महसूल विभागाच्या प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना जनहिताला प्राधान्य दिले आहे.











