गौरव पोंक्षे | माखजन
शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात.कळत नकळत शिक्षकांच्या वागणुकीतूनच विद्यार्थ्यांवर संस्कार होत असतात.शिक्षक हा देखील माणूसच आहे.त्यामुळे कमतरता ह्या असतातच.शिक्षकांनी विद्यार्थ्यासमोर आदर्श म्हणून जाताना, या कमतरता ओळखून त्यावर काम करावे व परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा.असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वैदेही रानडे यांनी केले.त्या रत्नागिरी च्या पटवर्धन हायस्कुल व ज्युनिअर कॉलजे येथे सुरु असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर डाएट चे प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर,अधिव्याख्यता राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे,शिक्षण खात्याच्या सौ जगदाळे,उपस्थित होत्या.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे तर्फे संपूर्ण राज्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरु आहे.यामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी तर्फे या प्रशिक्षणाचे आयोजन रत्नागिरी च्या पटवर्धन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आले आहे.
सौ रानडे पुढे म्हणाल्या की अनेक शिक्षक खूप छान उपक्रमशील असतात.याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल हे त्यांनी पाहावे.काही शिक्षकांना तंत्रज्ञानाची कमी माहिती असते.ती अवगत करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला यावेळी दिला.सुरु असलेल्या प्रशिक्षणातून आपल्याला जास्तीत जास्त काय घेता येईल याचा प्रत्येक शिक्षकाने विचार करा.यासाठीच ही प्रशिक्षणे असतात असे नमूद केले.प्रत्येक शिक्षकाने वर्तमानात काय घडामोडी घडतात,शिक्षण क्षेत्रात नवनवीन काय येते आहे.याकडे लक्ष द्यावे.पुस्तकापलीकडे आपण विद्यार्थ्यांना काही देतो का याचा प्रत्येकाने जरूर विचार करा असे नमूद केले.यावेळी एम.बी बापट यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रशिक्षणात प्रा.प्रभात कोकजे यांच्यासह प्रा सौ मानसी गानू, प्रा सागर पोकळे,श्री एस एस पडवेकर,श्री एम बी बापट,श्रीम.ए जे काणे,श्रीम.एस.व्ही चिले,श्रीम.एस आर बोडेकर, आदी प्रशिक्षकाचे काम करत आहेत.
या प्रशिक्षणाला प्रा राहुल यादव,प्रा सुयोग तांबे,ओंकार नामजोशी,महादेव शिंदे,प्रा.प्रशांत मेश्राम,प्रा.ओंकार प्रसादे,प्रा.अमोल धुलप,प्रा सचिन टेकाळे,प्रा अभिजित गुरव,सौ आरती रानडे,सौ विनया दातार,प्रा सुशांत मोहिते,एन.एस.बांदार,प्रा दत्तप्रसाद सिनकर,प्रा सौ भाग्यदेवी चोगले आदिंसह मोठ्याप्रमाणात शिक्षक वर्ग उपस्थित आहे.











