१४ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार?

३९ वर्षीय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा

कणकवली :
कणकवली तालुक्यालगतच्या एका गावात १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी संशयित साधारण ४० वर्षीय संशयीता विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर संशयिताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात बालकांवरील लैंगिक अत्याचारानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही आता सुरू आहे.

संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीवर सलग पाच ते सात वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केला. संशयित व्यक्ती कणकवली तालुक्यातील एका बागेत कामाला असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी देखील तपासाची चक्रे फिरवत ३९ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे.