सावंतवाडी :
मळगाव ब्राह्मणपाट येथील मूळ रहिवासी सदाशिव गणपत उर्फ बाळा राणे ( वय ५१, सध्या रा. ठाणे ) यांचे आज शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. भजनी बुवा म्हणून ते प्रसिद्ध होते. ते क्रिकेटपटू देखील होते. तरुणपणी ते मळगाव येथील क्रिकेट संघातून क्रिकेट खेळायचे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी, चुलत भाऊ, भावजया, काकी, पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मळगाव गावात शोक व्यक्त होत आहे. उद्या रविवारी सकाळीच त्यांचे पार्थिव मुंबई येथून मळगाव येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.













