देशी दारूच्या नशेत आढळलेल्या राजस्थानी तरुणावर गुन्हा दाखल

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड शहरातील छकुली देशी दारूच्या बारसमोरील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या एका राजस्थानी तरुणाविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास कैलास चंद्र शंकरलाल सैनी (वय ३२, मूळ रा. उदयपूरवाटी, जिल्हा झुंझुनू, राजस्थान) हा मंडणगड बाजारपेठेतील छकुली देशी बारसमोरील रस्त्यावर दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी पोलीस कर्मचाऱी संबंधदास मावची यांनी दिलेल्यी फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणाकडे तपासणीदरम्यान कोणताही मुद्देमाल आढळून आला नसल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.