सहवेदना ! शरद गणपत अवसरे

फोंडाघाट : फोंडाघाट- खैराटवाडी येथील ज्येष्ठ नागरिक शरद गणपत अवसरे (७६ वर्षे ) यांचे नुकतेच फोंडाघाट येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. मुंबई येथून भारतीय रिझर्व बॅंक मधून निवृत्त झाल्यानंतर,ते पत्नीसोबत फोंडाघाट – खैराटवाडी येथे वास्तव्यास होते. अतिशय मनमिळावू, शांत स्वभाव आणि सदा हसमुख असल्याने त्यांचा लोकसंपर्क मोठा होता. शिवसेना ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख प्रतिभा शरद अवसरे यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

शरद यांच्या दुःखद निधनानंतर जिल्हाप्रमुख वैभव नाईक,माजी खास. विनायक राऊत, सुशांत नाईक,राजू राठोड,माधवी दळवी, विजय जामदार, श्याम भुवड, सुरेश टक्के,अशोक सावंत,संजना कोलते, आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन फोंडाघाट येथे कुटुंबीयांची भेट घेऊन श्रद्धांजली वाहिली व सांत्वन केले.त्यांच्यावर अंत्यसंस्कार आणि उत्तरकार्य त्यांचे मूळ गावी राजापूर – पडवे येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीत शोक व्यक्त होत आहे…..