हातखंबा–रत्नागिरी महामार्गावर ओमनी व दुचाकीचालकांची बेदरकार वाहतूक; दोघांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
हातखंबा ते रत्‍नागिरी जाणाऱ्या हायवेवर बेदरकारपणे ओमनी व दुचाकी चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.25 वा.सुमारास करण्यात आली.
राजेश विलास पंडीत (35,रा.रविंद्रनगर कारवांचीवाडी,रत्‍नागिरी) आणि शुभम चंद्रकांत आग्रे (26,रा.डफळचोळवाडी खेडशी,रत्‍नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन चालकांची नावे आहेत. यातील राजेश पंडित हा आपल्या ताब्यातील ओमनी (एमएच-08-एजी-3482) तर शुभम आग्रे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीए-4260) घेउन हातखंबा ते रत्‍नागिरी जाणाऱ्या हायवेवर बेदरकारपणे व इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. दोघांच्याही विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.