माजी जलसंपदा अधिकारी विजय केतकर यांचे निधन

चिपळूण : माजी जलसंपदा अधिकारी विजय केतकर यांचे गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. विजय केतकर हे अलोरे आणि चिपळूण येथील जलसंपदा खात्यामध्ये कार्यरत होते. याच खात्यामध्ये काहीकाळ त्यानी रत्नागिरी येथेही सेवा बजावली होती.

 

अतिशय मनमिळावू स्वभाव आणि खूप मोठा लोकसंग्रह करणारे विजय केतकर यांनी काही वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन चैतन्य बुक डेपो आणि नवचैतन्य बुक डेपो अशी स्टेशनरीची दोन दुकाने सुरू करून व्यवसायसुद्धा उत्तम रीतीने नावाला आणला आहे. प्रभात रोड चिपळूण येथील व्यंकटेश अपार्टमेंट मध्ये राहणारे श्री.विजय केतकर हे मूळचे भिले तालुका चिपळूण येथील होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती वैशाली केतकर त्यांचे दोन कर्तबगार मुलगे अनिरुद्ध आणि आशिष तसेच दोन सुना सौ. सुप्रिया, सौ.वरदा आणि नातवंडे चि. सुमुख, चि. मृण्मयी असा परिवार आहे.