सिंधुदुर्ग जिल्हा शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत वेंगुर्लेतील मदर तेरेसा स्कूल चे घवघवीत यश…

वेंगुर्ले : प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा शालेय महिला हॉलीबॉल स्पर्धा वेंगुर्ला कॅम्प मैदानावर पार पाडल्या. ह्या स्पर्धेत जिल्यातील महिला हॉलीबॉल स्पर्धेत मोट्या सखेने संघ सहभागी झाले होते. मदर तेरेसा स्कूल च्या १४ वर्षा खालील संघाने अंतिम विजेते पद मिळविले तर १७ वर्षा खालील मुलींच्या संघाने देखील अंतिम विजेते पद मिळविले असा दुहेरी मान वेंगुर्ला संघाला मिळाला. ह्या दोनी संघाला वेंगुर्ला आर के स्पोर्ट अकॅडमी चे संस्थापक आणि राष्ट्रीय खेळाडू श्री. राधाकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मदर तेरेसा स्कूल चे क्रीडा शिक्षक श्री. संदेश रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशाळेचे मुख्याध्यापक फादर फेलेक्स लोबो व शिक्षक कर्मचारी तसेच वेंगुर्ला पॅरिस कौन्सिल मेम्बर श्री. कार्मिस आलमेडा यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आहे.