माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे श्री विष्णू मंदिरात श्रावण वद्य षष्ठी ते श्रावण वद्य अष्टमी असा ५ ते ७ सप्टेंबर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा होणार आहे.
यामध्ये ५ रोजी सकाळी श्रींची पवमानाभिषेक पूजा,रात्री ८.३० वाजता आरती मंत्रपुष्प,छबीना,११ वाजता कीर्तन
६ रोजी सकाळी ८ वाजता श्रींची पवमानाभिषेक पूजा ,दुपारी माहेरवाशिणींचा स्नेहमेळावा,८.३० वाजता आरती मंत्रपुष्प, रात्री ११ वाजता श्रींचे जन्मोत्सव कीर्तन,७ रोजी सकाळी पवमानाभिषेक पूजा,सकाळी १० पासून कीर्तन,विविध खेळ,हंडी फोडणे,नवसपूर्ती, दहिकाला. १.३० वा. महाप्रसाद.रात्री ९ वा. आरती मंत्रपुष्प,१० वाजता ‘अशा रंगल्या रात्री’ हा स्थानिक हौशी कलाकारांचा कार्यक्रम.उत्तर रात्री १ वाजता लळीताचे किर्तन होणार आहे.
उत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण साठे व सचिव विकास जाधव यांनी केले आहे.










