तहसीलदार ,बांधकाम विभाग, ट्रॅफिक पोलिस, महसूलचे अधिकारी ची घटनास्थळी धाव !
दरडी हटवून रस्ता एक मार्गी खुला
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : कालपासून सुरू झालेल्या संततदार पावसामुळे सुरक्षित असलेला फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर रस्त्यावर ,सकाळी १०च्या दरम्यान दरडी कोसळण्यास सुरुवात झाली. दर्डीचे दगड, मलबा,माती रस्त्यावर पसरल्याने वाहतूक अक्षरशः बंद झाली.
रस्ता बंद झाल्याचे समजताच नेहमी घाटात हजर असणारे ट्राफिक पोलीस कार्यरत झाले. बांधकाम विभागाला रस्ता बंद झाल्याचे वृत्त समजताच उपकार्यकारी अभियंता प्रभू मॅडम, अधिकारी अभियंता पवार-कांबळी तसेच कर्मचारी शाहू शेळके, पावसकर, सावंत इत्यादींनी घटनास्थळी धाव घेऊन पवन भालेकर यांच्या जेसीबी द्वारे दरडी हटवून एक मार्ग खुला केला. मात्र घडणीवरून पाझरणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे, दरडी कालांतराने कोसळत होत्या .यादरम्यान कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,खारेपाटण तलाठी अरुणा जयानावर यांचे सह अधिकारी वर्गाने, दरडी कोसळत असलेल्या ठिकाणची पाहणी करून दीक्षांत देशपांडे यांनी संबंधितांना एक मार्ग वाहतूक सुरू करण्यासाठी सूचना केल्या. त्यांचे समवेत फोंडा मंडळ अधिकारी नीलिमा प्रभू ,कोतवाल पांडुरंग राणे इत्यादी होते.फोंडा तलाठी तब्येत बरी नसल्यामुळे अनुपस्थित होते.
साधारण बारा ते एकच्या दरम्यान रस्त्यावरील दरडी बाजूला करून खोळंबलेली वाहतूक एक मार्गाने सुरळीत करण्यात आली. मात्र सतत पाऊस झाल्यास रस्ता रुंदीकरणामुळे घळणी मोकळ्या झाल्याने, दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .यावर बांधकाम विभाग आणि ट्राफिक पोलीस लक्ष देऊन आहेत….












