देव, घैसास, कीर महाविद्यालयात श्रावणोत्सव साजरा

 

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग, समारंभ समिती, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठमोळा पेहराव आणि संस्कृती रक्षणार्थ पारंपरिक विशेषतः श्रावणातील सण,विधी,अध्यात्मिक महत्व,निसर्ग बदल यांची जागृती हे कार्यक्रमाचे आकर्षण होते.

श्रावणोत्सव कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला सबलीकरण प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या श्रावणोत्सव कार्यक्रमामध्ये सर्व शाखांमधील विद्यार्थिनींनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये मंगळागौर, एकवीरा आई गीत, झिम्मा फुगडी, भजन, गायन, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील , उपप्राचार्य सौ. वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखा प्रमुख सौ. निलोफर बन्नीकोप, कला शाखा आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, समारंभ समितीप्रमुख अनन्या धुंदूर, प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले.