श्री भगवती हायस्कुल मुणगे येथे वार्षिक गुणगौरव कार्यक्रम
मसुरे | झुंजार पेडणेकर : स्वर्गीय बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या दातृत्वाचा गुण आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. या प्रशालेचे अनेक विध्यार्थी आज यशोशिखरावर आहेत. गावात शिक्षण घेऊन आमचे विध्यार्थी मोठ्या शहरातील विध्यार्थ्यां सोबत स्पर्धा करत आहेत. शिक्षणाच्या आड तुमची घरची परिस्थिती येऊ देऊ नका. संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी राहील. स्पर्धा परीक्षा केंद्र मुणगे येथे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे कार्याध्यक्ष श्री नारायण आडकर यांनी मुणगे येथे केले.
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि स्वर्गीय विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे विद्यार्थी वार्षिक गुणगौरव कार्यक्रम व स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी कथामाला मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर, सरपंच सौ. अंजली सावंत, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, माजी सभापती भाई पारकर, माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर, मुख्याध्यापिका मोनिका कुंज, माजी सरपंच वसंत शेट्ये, ग्रा सदस्य दशरथ मुणगेकर, प्रमोद सावंत, धर्माजी आडकर, वसंत गुरव, भरत सावंत, विश्वास मुणगेकर, साहित्यिक शरयू घाडी, सीताराम मुणगेकर, शालिनी मेस्त्री आदी उपस्थित होते. सुरेश ठाकूर म्हणाले, स्वर्गीय बापुसाहेबांच्या उदार दातृत्वातून या शाळेची उभारणी झाली आहे. त्या काळात मोठ्या कष्ठातून मुलांनी शिक्षण घेतले आहे. आवडीचे शिक्षण तुम्ही घ्या आणि खूप मोठे व्हा! माजी सभापती सुनील पारकर म्हणाले, आज जगात अनेक क्षेत्रे आहेत त्यात करियर करू शकता. बौद्धिक आणि शारीरिक विकासा बरोबरच ध्येय निश्चित करा. यशाला शॉर्ट कट नसतो. सरपंच अंजली सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विज्ञान प्रदर्शन, चित्रकला दालन याचे मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी “अंतरंग” या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच गुणवंत विध्यार्थी, आदर्श विध्यार्थी याना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. यावेळी एन. जी. वीरकर, प्रसाद बागवे, सौ गौरी तवटे, सौ कुमठेकर, हरीश महाले, सुविधा बोरकर, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, झुंजार पेडणेकर, स्वप्नील कांदळगावकर, एन एल बागवे, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, मनिष शेट्ये, प्रणय पुजारे, देविदास बोरकर, प्रणय पुजारे, मनिष शेट्ये, देविदास बोरकर तसेच शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिक मोनिका कुंज, सुत्रसंचलन प्रसाद बागवे, सौ मिताली हिर्लेकर, सौ गौरी तवटे, आभार सौ. कुमठेकर यांनी मानले.










