श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न..
वेंगुर्ले : प्रतिनिधी lआजी आजोबा दिन श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना शाळेच्या गेटपासून लेझीम नृत्याच्या सहाय्याने वाजत गाजत हॉलमध्ये आणण्यात आले. यावेळी त्यांची वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली. नातवांनी आपल्या आजी आजोबांचे पाद्यपूजन केले. यावेळी विद्यार्थी आणि आजी आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले होते. पाद्यपूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांना गोड खाऊ खायला दिला, आजी आजोबांनी सुद्धा मोठ्या मनाने आपल्या या नातं नातींना भरभरून आशीर्वाद दिले. यानंतर सर्व आजी-आजोबांना व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आले.
आजी आजोबा दिनाविषयी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर श्री सूर्यकांत सुतार सर , श्री संदीप तुळसकर सर ,श्री बबन घोडे पाटील सर यांनी आजी आजोबा दिना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि या कार्यक्रमावेळी उपस्थित शाळा समिती सदस्या सौ. सुजाता पडवळ यांनी आजी आजोबा दिना च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोडे पाटील सरांनी केले आणि आभार सूर्यकांत सुतार सरांनी मानले.












