वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप
वेंगुर्ले l दाजी नाईक :भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशाल परब यांनी बोलताना… भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा सार्थ अभिमान आहे. जनसेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, सत्ता नसेल तर जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा हीच पक्षाची भूमिका आहे. जनसेवेसाठी आणि विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, हा विश्वास त्यांनी सर्वांना दिला.
प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सोमा मिस्त्री, सत्यवान परब, धर्मराज कांबळी, वामन गावडे, प्रसन्ना देसाई, सत्याविजय गावडे, शेखर काणेकर, प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव दोडावडेकर, साईप्रसाद नाईक, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, प्रशांत खानोलकर, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.












