मालवण | प्रतिनिधी : जय गणेश स्कूल मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेत मालवण टेबल टेनिस अकॅडमीची मुले यशस्वी झाली.
१४ वर्षांखालील मुली (जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण) आर्या दिघे, वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण, श्रिया नरे, दिया पराडकर विजयी झाले.
१४ वर्षांखालील मुले (जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण)
आधिष पेडणेकर, लौकीक तळवडेकर, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर, योगेश परुळेकर विजयी झाले.
१७ वर्षांखालील मुली विजयी (अ.शि.दे.टोपीवाला हायस्कूल मालवण) पावनी मालणकर, याज्ञी गोसावी, सृष्टी दिघे, स्वरा परब विजयी झाले.
१७ वर्षांखालील मुली (भंडारी हायस्कूल मालवण) दुर्वा चिपकर, नक्षत्रा जावकर, सौरवी देसुरकर उपविजयी झाले.
याशिवाय वैयक्तिक स्पर्धेसाठी इशांत वेंगुर्लेकर १७ वर्षाखालील मुले (टोपीवाला हायस्कूल)आणि दुर्वा चिपकर १७ वर्षांखालील मुली (भंडारी हायस्कूल)
यांची निवड झाली आहे.
ही सर्व मुले २५ आणि २६ आक्टोबर रोजी कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यशस्वी खेळाडूंचे महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर आणि सचिव हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.












