चौके l प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालयात आयुष्मान भवः साप्ताहीक आरोग्य केंद्र साप्ताहिक मेळावा शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.या साप्ताहिक आरोग्य मेळाव्यात सर्जन-डॉ.सागर कोल्हे,फिजिशियन-डॉ.गौरव घुर्यें,स्त्री रोग तज्ञ-डॉ अतुल लिपारे,बालरोग तज्ञ -डॉ.संदीप सावंत,कान,नाक,घसा -डॉ श्याम राणे,नेत्रशल्यचिकित्सक – डॉ जोशी, दंत चिकित्सक – डॉ . सूर्यवंशी उपस्थित रहाणार आहेत,या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक – मा.डॉ.श्रीपाद पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक. डॉ.सुनिता रामानंद डीन GMC SND.डॉ.सुबोध इंगळे.निवासी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत,या मेळाव्यात प्रसुती आणि त् स्त्री रोग,बालरोग,शस्त्रक्रिया,नाक- कान-डोळा,नेत्रविकार,मानसोपचार या विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या मेळाव्यासाठी पेंडूर- कट्टा परिसरातील रुग्णानी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संजय पोळ वैद्यकिय अधिक्षक व कर्मचारी वृंद ग्रामीण रुग्णालय पेंडुर..कट्टा.मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.









