समतेची आरती गाऊन गणरायाला दिला निरोप
खेड : रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यामध्ये हेदली गाव हे पुरोगामी गाव म्हणून ओळखले जाते. शासन निर्णय अंमलबजावणी करत गोवळकर कुटुंबायांनी पर्यावरण पुरक गणपती विसर्जन करुन गणरायाला समतेची आरती गाऊन निरोप दिला.
महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणपतीचे विसर्जन नदी, तलाव, ओढे, समुद्रामध्ये न करता कृत्रिम तलाव मध्ये विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. याला महानगरपालिका क्षेत्रात अंमलबजावणी सुध्दा करण्यात येत असून त्याला प्रतिसाद ही चांगला मिळत आहे. पण ग्रामीण भागात लोकांचा कळ हा नदी, नाले, ओढे, समुद्र, यामध्ये विसर्जन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा मोडीत काढून गोवळकर कुटुंबायांनी शाळू मूर्तीचे पर्यावरण पूरक विसर्जन केले.
मूर्तीच्या विसर्जनाची माती व निर्माल्य झाडांना खत म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील गोवळकर यांनी दिली.
हेदली ग्रामपंचायत सदस्य संजय गोवळकर यांनी पुरक गणपती उत्सव ही काळाची गरज असून पर्यावरणाचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.
गोवळकर कुटुंबिय यांनी गणपतीच्या सजावटी मध्ये संविधानाची जनजागृती देखावा सादर केला होता.

समतेची आरती गाऊन गणरायाला निरोप
या आरती मधून पर्यावरण रक्षणचा संदेश दिला आहे.समाजामध्ये मानवतेने व बंधुभावाने राहण्याचा संदेश यातून दिला जातो. मानवतावाद व शोधक बुद्धी प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणली पाहिजे असा संदेश या आरतीच्या माध्यामातून दिला गेला आहे. विशेष म्हणजे ही आरती बच्चे कंपनीच्या आवडीची असलेली आरती या गणेशोत्सवाचे मुख्य केंद्र बिंदू ठरत आहेत.आपली संस्कृती परंपरा या पर्यावरण रक्षण, समाज बांधीलकी त्यातून समानता टिकावी हा या आरतीचा मुख्य हेतू आहे.
गणपती उत्सहात मनोरंजन व कोकणची लोक कला म्हणजे जाखडी नृत्य. या कलेतून शाहिर सचिन गोवळकर हे समाज प्रबोधन गिते गाऊन प्रबोधन करतात.त्यामुळे महापुरुषाचे विचार आज घरोघरी रुजवू लागले आहेत. त्यामुळे उत्सवातून समाज प्रबोधन होत असल्यामुळे गावात परिवर्तन दिसत आहे.

समाज प्रबोधन करत असताना आरती समतेची माध्यमातून केवळ समाज प्रबोधन नव्हेतर उत्सव काळात निर्माल्य नदी पात्रात टाकून पाणी प्रदूषण होत असते हे पटवून देण्यात आले. प्रदुषण मुक्त गणेश उत्सव साजरा करता येईल यांचे महत्व पटवून दिले आहे.त्यामुळे अभिनव उपक्रमाची चर्चा व कौतुक सर्व स्थरातुन होत आहे.
आरती समतेची
(चाल :येई वो विठ्ठले माझे माऊली ये )
यारे या जन सारे,आरती समतेची गाऊ
शिकवण बंधूत्वाची SS आपुल्या मनोमनी रुजवू || धृ ||
देश आमुचा विविधतेने जगात हा नटला
नाना रंगी फुले उमलली बाग जणू फुलला
देश उन्नतीसाठी SS सारे एकजूट होऊ || 1 ||
संत महात्मे या धरतीवर जन्माला आले
मानवतेचा मंत्र देऊनी अमरपदी गेले
विसरुन जाती पाती SS बंधूभावाने राहू || 2 ||
थोराची वाचूनी चरित्रे मन आपुले घडते
अतुट नाते समाज जिवनासवे इथे जडते
समतेचा शांतीचा SS झेंडा चहुकडे मिरवू || 3 ||
विकसित होई विवेकबुध्दी विद्यार्जन करीता
ज्ञानासंगे कर्तत्वाचे पाऊल ही पडता
धडा सहजिवनाचा विद्यामंदिरत गिरवू || 4 ||
उच्च कुळी जन्माला म्हणून का थोर कुणी ठरतो
विचार करणी आचारणाने जगी अमर होतो
समाजसेवेसाठी सारे सज्ज आता होऊ || 5 ||












