दापोली l प्रतिनिधी: नगरपंचायतीच्यावतीने शुक्रवारी अमृृतकलश यात्रा दापोली नगरपंचायत कार्यालय ते छत्रपती शिवस्मारक ते दापोली नगरपंंचायत कार्यालय अशी आयोजित केली होती. अमृत कलश यात्रेकरीता दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. साधना बाळासाहेब बोत्रे (उपसभापती महिला व बालकल्याण समिती तथा महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सदर अमृत कलश यात्रेकरीता दापोली शहरातील माजी सैनिक सईद देशमुख, राजेंद्र कदम, श्री.कासारे, व संदिप यादव हे उपस्थित होते. तसेच दापोली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रविण खरात, लेखापाल व अंतर्गत लेखापरीक्षक सिध्देश खामकर, अभियंता सुनिल सावके व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर यात्रेकरीता दापोली नगरपंचायत हद्दीतील जिजाऊ शहरस्तर संघ दापोली व जोगेश्वरी प्रभुआळी, श्री समर्थ उदयनगर, शिवसमर्थ काळकाई कोंड, प्रगती खोंडा, माशाअल्ला खोंडा, साईनाथ काळकाई कोंड, मैत्री काळकाई कोंड, स्वामीनी फॅमिली माळ, ओमसाई बाजारपेठ, भाग्यलक्ष्मी काळकाई कोंड, भाग्योदय उदयनगर, महापुरूष वडाचाकोंड, मुस्लिम सोसायटी खोंडा इत्यादी महिला बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. यात्रेकरीता दापोली शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व शहरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
यात्रेदरम्यान शहरातील सर्व नागरिकांकडून अमृत कलशसाठी माती संकलित करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे उपस्थित सर्वांनी पंचप्राण शपथ घेतली. सदर अमृत कलश यात्रेचे नियोजन दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीम. हर्षला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले.











