बंद तुळजापूर बस अथवा अन्य एसटी बस सेवा सुरु करा

 

सकाळी 7 च्या दरम्यान एसटी बस नसल्याने चौके-कट्टा-वराड येथून कॉलेजला जाणाऱ्या मुलांना समस्या : पालक व विध्यार्थ्यांनी एसटी प्रशासनाचे वेधले लक्ष 

मालवण | प्रतिनिधी :मालवण बस स्थानाकातून सकाळी सुटणारी मालवण तुळजापूर ही गाडी बंद करण्यात आली आहे. सकाळच्या वेळी चौके, कुणकावळे, गुरामवाड, कट्टा, वराड, सुकळवाड याभागातुन मोठ्या प्रमाणात मुले कॉलेज कसाल, कणकवली व ठिकाणी जातात. सकाळच्या रत्नागिरी गाडीनंतर तुळजापूर गाडी मुलांना कॉलेज मध्ये जाण्यासाठी योग्य होती. तुळजापुर गाडी बंद केल्याने रत्नागिरी गाडीला गर्दी असते. परीणामी एखाद्या स्टॉपवर बस थांबत नाही. त्यानंरची गाडी ही उशिरा आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. तरी तुळजापूर गाडी किंवा त्यावेळेस कसाल कणकवली पर्यंत अन्य बस करावी अशी मागणी वसंत वराडकर व अन्य पालक विध्यार्थी यांच्या माध्यमातून होत आहे. अशी माहिती वराड भाजप शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगांवकर यांनी दिली आहे.