लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका कार्यकारी जाहीर

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची कार्यकारणी तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष अभिजीत राजेशिर्के यांनी आपली तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये उपाध्यक्षपदी दत्ताराम साळुंखे, विकास मांडवकर, अनिस वाचू, संजय खानविलकर व नितीन गाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरचिटणीस म्हणून संजय बुर्टे, एकनाथ खेतल, समीर तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे .सचिव पदी ललित पांचाळ, युनूस रखांगी तर सदस्य म्हणून अजित शिगम, जितेंद्र खानविलकर, भिकू जाधव, मोहन गुरव, पांडुरंग साळुंखे, शशिकांत बापार्डेकर, देवेंद्र गुरव, महेंद्र करंबेळे, राजेंद्र सावंत, उस्मान म्हालदार, बाळकृष्ण बाईत यांची निवड करण्यात आली आहे.