पाटपन्हाळे येथे काँक्रीटचा रस्ता खचला

गुहागर-विजापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणातील निकृष्ट कामांची मालिकाच सुरु आहे. पाटपन्हाळे येथे काँक्रीटचा रस्ता खचला असून येथील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच मातीचा भराव रस्त्यावरच आणून टाकल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे..रस्ता रुंदीकरणात निकृष्ट कामाचे अनेक नमुने पहायला मिळत आहेत. कधी गटारे ढासळत आहेत. कॉक्रीट रस्त्याला तडे जात आहेत तर संरक्षक भिंतीही ढासळत आहेत. पाटपन्हाळे बसथांब्याजवळ रस्ता मधोमध खचला आहे. खचलेल्या रस्त्याच्या बाजूला मातीचा भराव टाकण्यात आलेला आहे. खचलेली बाजू बंद करण्यात आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे.