देवगड बाजारपेठ कडे जाणाऱ्या वळणावर दोन दुचाकी मध्ये अपघात; एकाच्या पायाला गंभीर दुखापत 

देवगड | प्रतिनिधी : देवगड बाजारपेठकडे जाताना आनंदवाडी रस्त्याच्या चढावाजवळ असलेल्या वळणावर दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दोन्ही मोटरसायकल स्वार जखमी झाले अजूनही त्यापैकी शशिकांत मुरलीधर दहीबावकर वय 55 राहणार जामसंडे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमाला झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार देवगड बाजारपेठेतून मंगेश विलास घाडी 34 (राहणार जामसंडे आझाद नगर) हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच ०७ के ८२६२ वरून आपले काम आठवण घरी जात होते. तर जामसंडे वेळवाडी येथून शशिकांत दहिबावकर हे देवगड बाजारपेठ येथे मोटरसायकल क्रमांक MH ०७ AJ ४५१७ या गाडीने जात असताना देवगड आनंदवाडी रस्त्यावर देवगड खालची बाजारपेठकडे जाणाऱ्या वळणावर दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात शशिकांत दहिबावकर यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून या अपघाताची माहिती मिळताच देवगड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एफ जे आगा, पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही एस बिर्जे, निलेश पाटील यांनी अपघातस्थळी भेट देऊन तात्काळ १०८ रुग्णवाहिलेला बोलावून गंभीर जखमी असलेल्या शशिकांत दहिबावकर यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. दरम्यान याच अपघातातील दुसरे मोटारसायकल अपघात ग्रस्त मंगेश घाडी यांच्या या अपघातात पायाला दुखापत झाल्याने ते स्वतः देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन उपचार घेत होते .