बांदा (प्रतिनिधी) :
दिवाळीच्या निमित्ताने साई मठ आळवाडी बांदा येथे सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी दशावतार मधील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक मयूर गवळी यांची युट्युब वरील गाजलेल्या गाण्यांची सुरेल दशावतार संगीत मैफिल आयोजित केली आहे. या मैफिलीला सिंधुदुर्गातील बुलंद आवाज राजा सामंत यांचे निवेदन व कौशल मेस्त्री यांचे पखवाज वादन व बाबाजी गावकर यांचे झांजवादन होणार आहे.
या मैफिलीत दशावतारातील जुन्या गमतीदार आठवणी, डायलॉग व मयूर गवळी यांच्या लाखो चाहत्यांची पसंती मिळालेली युट्युबवरील प्रसिद्ध गाणी सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचा संगीतप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन पाटेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आळवाडी बांदा यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.











